breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतीय समाजामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृती असली पाहिजे : कामगार नेते सचिन लांडगे

  • भोसरी परिसरात श्रीराम नवमीनिमित्त भव्य दुचाकी रॅली

पिंपरी : ‘रामनवमी’ म्हणजे मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस प्रभू श्रीरामाने रामायण काळात अंगिकारलेल्या नैतिक मूल्यांचा प्रचार-प्रसार जनमाणसापर्यंत व्हावा व विखुरलेल्या भारतीय समाजाने एकसंध होवून नैतिकतेच्या दृष्टिकोनातून  ‘एक राष्ट्र’ म्हणून राष्ट्रविकास व राष्ट्रसंवर्धनाकरीता काम करावे. वर्तमान भारतातील युवा पिढीच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याकरीताच आजच्या या भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे, असे मत कामगार नेते सचिन लांडगे यांनी व्यक्त केले.

भोसरी परिसरात श्रीराम नवमीनिमित्त भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. महिलांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी  ९  वाजता कामगार नेते सचिन लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये  माजी नगरसेवक सागर गवळी युवामंच व कविता भोंगाळे युवामंच यांच्या संयुक्त विद्यमाने दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते.

सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशांतता पाहता, आपल्या देशाला देखील भविष्यात कोणत्या नव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल याची शाश्वती देता येत नाही. अशा परिस्थीतीत देशातील सर्व समाजाने परस्परांमधील मतभेद विसरून एक राष्ट्र म्हणून एकत्र यावे, व राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सक्रियपणे सहभागी व्हावे, आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस कविता भोंगाळे- कडू, माजी नगरसेवक सागरभाऊ गवळी यांनी केले.

राम मंदिर चक्रपाणी  वसाहत, भोसरी येथून आळंदी रोड मार्गे विदर्भ मित्र मंडळ, दिघी रोड मार्गे पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर दुचाकी रॅली काढण्यात आली.

रॅलीमध्ये भोसरी परिसर व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील बहुतांश युवक सहभागी झाले होते.     विनायक भोंगाळे, माई गवळी, योगेश भोंगाळे, विजय भोसुरे, संजय भोंगाळे, प्रदीप तायडे यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button