breaking-newsपिंपरी / चिंचवड

असंघटीत कामगारांसाठी सुरक्षा मंडळ स्थापन करा

– कामगार मंत्री संजय  कुटे यांचेकडे  कष्टकरी संघर्ष महासंघाची  मागणी
 पिंपरी – महाराष्ट्रातील विविध असंघटीत क्षेत्रात  काम करणारे सुमारे  १२२ घटक आहेत. त्या असंघटित कामगारांसाठी  एकत्र  लाभ देण्यासाठी पावसाळी अधिवेशनात विषय घेउन  स्वतंत्र सामाजिक सुरक्षा महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी  राज्याचे कामगार मंत्री डॉ.संजय कुटे यांचेकडे केली.   कष्टकरी संघर्ष महासंघाचे शिष्ठमंडळाने त्यांची मंत्रालायात भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, निमंत्रक राजेश माने,उपाध्यक्ष चंद्रकांत कुंभार , राजु बिराजदार, आनंद कीशोर  ,ओमप्रकाश मोरया,उमेश डोर्ले, आदीचा शिष्ठमंडळात समावेश होता.
कष्टकरी महासंघाने दिलेल्या निवेदनात नमूद  राज्यात एकूण  कामगारांची संख्या पैकी ९०℅ हे असंघटित कामगार आहेत हि संख्या मोठ्या प्रमाणात जवळपास ४ कोटी एवढी आहे,   कामगार ,मजूर ,हमाल ,फेरीवाला ,विडीकामगार ,काचारावेचक,घरेलूकामगार , रिक्षाचालक, गटई कामगार  यांचे  सह या घटकांचे जीवन अधांतरी असून त्यांना सामाजिक सुरक्षा मिळणे गरजेचे आहे ,  आर्थिक मागास जीवन जगणारे घटकास वर काढणे त्यांना शाश्वत प्रयत्नातून   उन्नत अवस्था देणे ही शासनाची जबाबदारी आहे.
 सन २००८ मध्ये केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा कायदा केला  मात्र  त्याची जबाबदारी राज्यांकडे सोपवली यास सर्व राज्यांनी अनुत्सुक्तता दाखवली यामुळे हे काम पुढे गेले नाही याची माहिती देत , राज्यातील घरेलु कामगार मंडळात निधी नाही  ,राज्यात  मजूर ,कामाच्या ठिकानी राज्यात  दररोज अपघाती मृत्यू होत आहेत तर काहींना अपंगत्व येत आहे ,यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे जीवन निराधार होते हे नमूद करत  याबाबत चर्चा केली . राष्ट्रीय आयोग ने केलेल्या शिफारशींचा विचार करून त्यांना न्याय द्यावा .
 मुख्यमंत्रीं असंघटितासाठी स्वतंत्र मंडळ स्थापण्यास अनुकूल असून तशी तरतूद करून मागील वेळी सर्वेक्षण करण्याचे नियोजन मागील अर्थसन्कल्पात केले होते. याबाबत सकारात्मक विचार करुन योग्य निर्णय घेऊ असे अश्वासन  कामगार मंत्री यानी यावेळी दिले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button