breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: मनसेचा अभिनव संकल्प! तरुणांना इंपोर्ट- एक्सपोर्ट व डिजिटल मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण!

करोना व लॉकडाउनचा फटका साऱ्या देशालाच नव्हे तर जगाला बसत आहे. लॉकडाउन नंतर काय होणार हा प्रश्न शेतकरी, तरुण, बेरोजगार, उद्योजक आदी साऱ्यांनाच भेडसावत असताना मनसेने ‘चला उद्यमी महाराष्ट्र घडवूया’ हा उपक्रम महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत हाती घेतला आहे.

प्रामुख्याने शेतकरी बांधव, तरुण व बेरोजगारांना मनसेच्या ‘चला उद्यमी महाराष्ट्र घडवूया’ उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. याअंतर्गत आपला माल एक्सपोर्ट कसा करायचा तसेच आयात करायचे झाल्यास एखादी वस्तू वा सामान इंपोर्ट कसे करायचे ते ऑनलाइन शिकवले जाणार आहे. याचबरोबर डिजिटल मार्केटिंग चे तंत्रही शिकविण्यात येणार असून यासाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button