TOP Newsपुणेमनोरंजन

अखिल भारतीय सांस्कृतिक महोत्सवात साडेचार हजार कलाकारांचा सहभाग

पुणे : पुण्यात सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात संपूर्ण देशातून चार हजार ५०० कलाकार सहभागी झाले.
पुणे शहर आणि खेड्यापाड्यासह भारतातील विविध राज्यातील स्थानिक कलावंतांना आंतरराष्ट्रीय मंच मिळवून देणारा हा महोत्सव म्हणून अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या कल्चरल फोरम ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स याची ओळख निर्माण झाली आहे.

या महोत्सवातील विजेत्या कलावंताना विदेशात जाऊन नृत्य, गायन, वादनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करून देण्याची संधी यामुळे मिळते, त्याचा प्रत्येक कलावंतांनी लाभ घेतला पाहिजे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या १९ व्या कल्चरल फोरम ऑफ परफॉर्मिंग महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन झाले. यंदा महोत्सवामध्ये महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ येथील तब्बल पंधराशेहून अधिक कलावंत व संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. दि. २१ मे पासून सुरु झालेला हा महोत्सव दि. १ जूनपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित केला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून कलाविष्कार सुरु असून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रात गायन वादन आणि नृत्यविष्कार सादर होतील. एकूण ४ हजार ५०० कलाकारांचे साधरण एक हजार ५०० कार्यक्रम सादर होणार आहेत. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाचे हेमंत वाघ आणि रत्ना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेला हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी राजसी वाघ, ऋषिकेश थेटे, गौतम भोसले, संजय भुजबळ, चारुदत्त वैद्य, अमित कांबळे, अनिल भोमकर आदी परिश्रम घेत आहेत. सूत्रसंचालन मेघा होमकर, भागायश्री गोसावी, अमेया पळणीटकर, ऋचा जोशी, दीप्ती जोशी, इंद्रायणी दूधगीकर आदी करत आहेत.

या कार्यक्रमासाठी केया चंदा ( पश्चिम बंगाल) , डॉ. जॉय राधाकृष्णन ( केरळ), उज्वला नगरकर, स्नेहा पेटकर, विजया काळे परीक्षक म्हणून काम बघत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button