breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य सामूहिक श्री रामरक्षा पठण

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आयोजन

प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त आनंदोत्सव

पिंपरी : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा निमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम, कार्यक्रम आणि आनंदोत्सव साजरा केला जात आहे. यासह भव्य सामूहिक श्री रामरक्षा पठणही होणार आहे.

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने व संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जानेवारी रोजी केशवनगर, चिंचवड येथील श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडांगण येथे सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत हा अध्यात्मिक सोहळा होईल.यावेळी प्रसिद्ध अभिनेते व निवेदक राहुल सोलापूरकर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात सहभागी होऊन एक दिव्य सकाळ प्रभू श्रीराम चरणी अर्पण करुयात, असे आवाहन शंकर जगताप यांनी केले आहे.

हेही वाचा – मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड

दरम्यान, या सोहळ्याची पूर्व तयारी आढावा आणि नियोजन बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भास्कर भोर, संतोष सोबळकर, अविनाश आगज्ञान, डॉ. अजित जगताप, विश्व हिंदु परिषदेचे धनंजय गावडे, विजय देशपांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्षरविंद्र देशपांडे, भाजपा कोषाध्यक्ष संतोष निंबाळकर, माजी नगरसेवक सुरेशजी भोईर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button