breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनासोबत दिल्लीत ‘ब्लॅक फंगस’ची भीती

नवी दिल्ली – कोरोनाचा कहर असतानाच दिल्लीत ‘ब्लॅक फंगस’च सावट घोंघावू लागलं आहे. कोरोनामुळे ‘म्यूकोरमायसिस’ प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. म्यूकोरमायसिस एक कोरोनामुळे होणारं फंगल संक्रमण असून या आजारामुळे डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी याबाबत सांगितले की, ‘आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसात म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण भरती झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आलं होतं. तसेच नाक आणि गळ्याचं हाड गळून गेलं होतं.’ त्याचबरोबर ‘मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे’, असे ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button