पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता माफ करा

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी l प्रतिनिधी

नवी मुंबई आणि मुंबई शहरातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

फेडरेशनच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने पिंपरी चिंचवड शहरातील 500 चौरस फूटपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या मंजुरीसाठी हा ठराव पाठवण्यात आला आहे. त्या ठरवाला मंजुरी देऊन पिंपरी चिंचवड शहरातील 500 चौरस फुटापर्यंतच्या मालमत्तेचा मालमत्ता कर माफ करावा. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट द्यावी. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

जर नवी मुंबई व मुबई महानगरपालिकेतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ होत असेल, तर मुख्यमंत्री महोदयांनी पिंपरी चिंचवड शहरातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ करून करून पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब जनतेला न्याय द्यावा, असे चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button