breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

Lockdown : वाहनांवरील विमा प्रिमीयम आकारणीत सवलत द्यावी – पक्षनेते नामदेव ढाके

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्रात वाहनांवरील विमा प्रिमीयम आकारणीत सवलत देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मुंबई प्रादेशिक कार्यालयाकडे केली आहे.

सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून महाराष्ट्र राज्यामध्ये देखील सदर कोरोना विषाणू चा संसर्ग वाढून थैमान घातले आहे. या पाश्वभूमीवर संपूर्ण भारतामध्ये २१ मार्च २०२० पासून लॉकडाऊन घोषीत केलेले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वाहने जसे की ट्रान्सपोर्ट, टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स, सर्व प्रकारची खाजगी वाहने ही सुमारे तीन महिन्यापासून एका जागेवर उभी आहेत तसेच सर्व उदयोगधंदे देखील बंद आहेत. त्यामुळे या काळात सर्व व्यावसायिकांना, नागरिकांना सर्व माध्यमातून मिळणारे उत्पन्न कुंटीत झाले आहे. या आर्थिक परिस्थितीमुळे सर्वच व्यावसायिक व नागरिक मेटाकुटीस आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांकडून, व्यावसायिकांकडून वाहनांवरील संपूर्ण वर्षाचा विमा वसूल करणे उचीत ठरणार नाही.

तरी आपणास सदर पत्रान्वये विनंती करण्यात येते की सर्व प्रकारच्या वाहनांचा चालु वर्षातील विमा प्रिमियम आकारणी करताना तो बारा महिन्यांचा न करता लॉकडाऊन चा कालावधी विचारात घेवून पंधरा महिन्यांसाठी एकच प्रिमियम आकारणी करणेबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ढाके यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button