breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शासकीय कामांसाठीची मुळशीकरांची वणवण व आर्थिक लूट कायमस्वरुपी थांबणार

जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष अक्षय सातपुते जोपासताहेत सामाजिक बांधिलकी…

पुणे । हल्ली प्रत्येकालाच शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते. सध्या शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांची लगबग सुरू आहे. तंत्रशिक्षण, कौशल्य अभ्यासक्रमांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता असते.

ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध कागदपत्रे दिली जातात. त्यासाठी शासनाने दर निश्चित केले आहेत; परंतु केंद्रचालकांकडून नागरिकांची लूट केली जात आहे. केंद्र घेण्यासाठी आम्हाला लोकांची सेवा करायची आहे, असा भास निर्माण केला जातो. केंद्र मिळाल्यानंतर मात्र प्रत्येक दाखल्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अवाच्या सवा रक्कम वसूल केली जाते. त्यामुळे ई-सेवा केंद्रांकडून ‘सेवेचा मेवा’ लाटला जात असल्याचा प्रकार होत असतो. मात्र अशा गोष्टींना छेद देत जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष अक्षय सातपुते यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सातपुते यांनी सुरू केलेल्या महाईसेवा केंद्राद्वारे सर्व प्रकारचे दाखले मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन अक्षय सातपुते (88881 00204) यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button