breaking-newsपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या शिक्षकांनी गिरविले ‘विकल्पाचे धडे’, 7 वा वेतनाचा संभ्रम झाला दूर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पदवीधर शिक्षक संघटनेच्या मागणीचा विचार करून शिक्षकांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश काढला. या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने विकल्प कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

महापालिका प्राथमिक शिक्षकांचे विकल्प भरून घेण्याची आवश्यक आहे. 1 जानेवारी 2016 की 1 जुलै 2016 यापैकी नेमका कोणता विकल्प निवडावा, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम होता. त्यावर मंगळवारी (दि. 11) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड स्टेशन शाळा सभागृहात संघटनेच्या वतीने शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यात योग्य विकल्प जोडपत्र कसा भरावा, कोणता विकल्प निवडावा, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन स्क्रीनवर प्रोजेक्टरच्या साहाय्याने प्राथमिक शिक्षण विभागाचे माजी पर्यवेक्षक प्रभाकर मेरुकर, कुमठेकर, लेखा विभागातील सतीश सावंत, खाजगी संस्थेतील उदय जिचकर तसेच अमोल भालेकर, गणेश लिगडे, कृष्णा घाडगे  यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून सकाळ सत्रातील शिक्षकांनी  शाळा सुटल्यावर दुपार सत्रात व दुपार सत्रातील शाळेतील शिक्षकांनी सकाळ सत्रात कार्यशाळेत सहभाग नोंदवला. अशाप्रकारे दोन सत्रांमध्ये कार्यशाळा घेण्यात येऊन शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. याबद्दल अनेक शिक्षकांनी पदवीधर शिक्षक संघटनेच्या स्तुत्य उपक्रमाचे व आयोजित कार्यशाळेचे कौतुक केले. काही कारणास्तव ज्या शिक्षकांना या कार्यशाळेत सहभागी होता आले नाही, त्यांनाही व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांच्या विकल्पबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महापालिका प्राथमिक शिक्षण विभागात 90 % महिला शिक्षिका आहेत. अनेक शिक्षकांमध्ये विकल्प कसा भरावा, जून की जुलै निवडावा याबाबत संभ्रम होता. शिक्षकांच्या प्रतिसादामुळे ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

मनोज मराठे, अध्यक्ष – शिक्षक संघटना


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button