आळंदी, देहूरोड, निगडी, चिखलीमधून पाच दुचाकी चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी
निगडी, आळंदी, देहूरोड आणि चिखली परिसरातून पाच दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 23) अज्ञातांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय दत्तात्रय आरेकर (वय 25, रा. निगडी) आणि हर्षद संदीप मोरे (वय 20, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय आरेकर यांची 22 हजारांची स्प्लेंडर दुचाकी आणि हर्षद मोरे यांची 10 हजारांची बजाज प्लॅटीना दुचाकी चोरीला गेली आहे.
सिधू शंकर कुदळे (वय 45, रा. रहाटणी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुदळे यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी गाडगे महाराज मंगल कार्यालयाच्या समोरील पार्किंग मधून चोरीला गेली आहे.
सुनील राजेश्वर आगरवाल (वय 59, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी विकासनगर येथील माऊली हॉस्पिटल समोरून चोरीला गेली आहे.
मोहम्मद अमीरअली सैद मोहम्मद सलमानी (वय 28, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.