breaking-newsपिंपरी / चिंचवड

डेंग्यू डासोत्पत्ती ठिकाणे आढळल्याने बड्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

अस्वच्छता, आरोग्यास अपायकारक परिस्थिती करणे आणि डेंग्यू डास उत्पत्ती होणारी ठिकाणे आढळल्यामुळे शहरातील तीन आस्थापनांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 33 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहराच्या विविध भागात अस्वच्छता, डासांची उत्पती होणा-या ठिकाणांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई हाती घेतली आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे सौदागर येथील विवांता रियालिटीमध्ये डास उत्पत्तीचे ठिकाण आढळले. त्याच्यावर कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पिंपळे निलख येथील बालाजी व्हेंचर येथे कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 25 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच, अस्वच्छता निर्माण केल्याबाबत तीन व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button