पिंपरी / चिंचवड

केक शॉपमधून ग्राहक महिलेचा मोबाईल पळवला

पिंपरी l प्रतिनिधी

रुपीनगर येथील एका केक शॉपमध्ये केक आणि इतर सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी पावणे चार ते सव्वा चार वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी दुपारी रुपीनगर येथील हुमा बेकरीमध्ये केक आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या. बेकरी मधून केक आणि तर साहित्य खरेदी करत असताना फिर्यादी यांनी त्यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन दुकानातील फ्रीजरवर ठेवला. फिर्यादी यांचे लक्ष विचलित झाल्याचा गैरफायदा घेऊन चोरट्याने फिर्यादीचा मोबाईल फोन चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button