breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्री क्ष्रेत्र देहू ते श्री क्षेत्र आळंदी पर्यावरण जनजागृती पदयात्रा

पिंपरी : इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रदूषण यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता या पद यात्रेला सुरवात झाली होती. पर्यावरण जनजागृती पदयात्रा श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र आळंदी अशी आयोजित करण्यात आली होती. देहू व आळंदी ही महाराष्ट्राची दोन बलाढ्य शक्ती आणि ऊर्जा स्थान आहेत. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांनी सर्व जगाला विचारांची आणि आचारांची संतवानी दिली. यांच्याच साक्षीने व आशिर्वादाने महाराष्ट्राच्या येणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी व एक स्वच्छ सुंदर पर्यावरण देण्यासाठी देहू ते आळंदी असा प्रवास करत पर्यावरण लढ्याचा संदेश देण्यात आला.

प्रशांत राऊळ म्हणाले, आपल्या ज्या नद्या आहेत त्यांना आपण जीवन म्हणतो,इंद्रायणी नदीला आपण इंद्रायणी माता म्हणतो. देहू ते आळंदी पर्यँत नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित व रासायनिक पाणी हे इंद्रायणी नदी मध्ये सोडले जाते. नदीच्या ज्या प्रणाली आहेत, ओढे व नाले, झरे यावर अतिक्रमण होत आहेत. त्यांचे जीवन संपवले जात आहे. या नदीच्या या प्रणाली संपवतो त्यामुळे नदी संपवतो.

नदीला जीवनदाहिनी म्हटले जाते. जीवनदाहिनी संपली तर आपण संपणार आहोत. हे कुठं तरी कळाले पाहिजे. आपण पुढच्या पिढी साठी काय सोडून चाललो आहोत. विषारी पाणी, विषारी अन्न विषारी वायू ज्याच्या मुळे त्यांना रोगीआरोग्य देऊन चाललो आहोत. यासाठी नागरिकाने जागे होण्याचे गरजचे आहे. सर्व गोष्टी प्रशासन, सरकार अपेक्षा करून चालणार नाही. लोकांनी सर्व गोष्टी हातात घेऊन पुढे केले पाहिजे. लोकसहभागातून या गोष्टी शक्य आहे.

हेही वाचा – महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला’; सुप्रिया सुळेंची माहिती

महानगरपालिकेचे माहिती प्रमाणे २१ एस टी पी आहेत. या एसटीपीचे खरंच पाणी शुद्ध होत आहे का? प्रक्रिया केली जाते का? असा प्रश्न उपस्थित केला. पिंपरी चिंचवड शहरासाठी सह शहर अभियंता पर्यावरणा साठी वेगळा अधिकारी आहे अशी माहिती देत त्या आधिकऱ्यावर ताशेरे ओढले. कोणते विषय नगरपालिका, राज्यसरकार व केंद्रासरकार मध्ये येतात. आपण नेमकं कोणा कडे जाऊन सांगायचं हे कळलं पाहिजे. अधिकार व अंमलबजावणी हे दोन्ही झाली पाहजे. यावेळी राम झरा विषयी एका सामाजिक संस्थेने माहिती दिली.

या पर्यावरण जनजागृती मध्ये इंद्रायणी जल मित्र,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ग्रीन आर्मी पिंपरी चिंचवड, अंघोळीची गोळी, वृक्ष मित्र,आळंदी जनहित फाऊंडेशन, इंद्रायणी सेवा फाऊंडेशन, उद्धव ठाकरे शिवसेना व इतर सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रदूषणा बाबत अभ्यास व प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना, ध्येय धोरण याविषयी येथे माहिती देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button