पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या पाच घटना : अडीच लाखांचा ऐवज चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर परिसरात तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, निगडी, वाकड आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात तीन दुचाकींसह अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 2) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तुकाराम शिवाजी कांबळे (वय 33, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. रोमन हिल्स सोसायटीच्या बाजूला सोमाटणे फाटा येथून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 20 हजार रुपये किमतीच्या 40 चौरस मीटरच्या ऍल्युमिनिअमच्या प्लेट चोरून नेल्या.

देऊबाई राम शेळके (वय 68, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी 31 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाच ते सहा वाजताच्या कालावधीत सोमाटणे फाटा ते लक्ष्मणनगर थेरगाव या मार्गावरून पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बस प्रवासादरम्यान फिर्यादी यांच्या हातातील 70 हजारांची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

सुदवडी गावातून 10 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. दशरथ रमेश गायकवाड (वय 39, रा. देहूगाव) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंधुनगर प्राधिकरण येथून 30 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी अपर्णा अतुल तळेगावकर (वय 56, रा. सिंधुनगर, प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सादिक ताजीबर उज्जमन (वय 32, रा. तापकीरनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 20 हजारांची दुचाकी मोशी परिसरातून चोरीला गेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button