breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड परिसरात कोरोना लसीकरण केंद्राची संख्या वाढवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी – वाकड परिसराची लोकसंख्या मोठी आहे. सध्या वाकड गावठाणात एकच केंद्र सुरु आहे. हे केंद्र या भागाच्या एका टोकाला आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय केंद्रावर गर्दी असल्यामुळे बऱ्याच जणांना लस न घेताच मागे परतावे लागत आहे. त्यामुळे वाकड परिसरात कोरोना लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

वाचा :-यमुनानगर येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू

आयुक्तांना यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाकड परिसराची लोकसंख्या मोठी आहे. सध्या वाकड गावठाणात लसीकरण एकच केंद्र सुरु आहे. हे केंद्र या भागाच्या एका टोकाला आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय केंद्रावर गर्दी असल्यामुळे बऱ्याच जणांना लस न घेताच मागे परतावे लागत आहे. त्यामुळे वाकड परिसरात कोरोना लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी.

महापालिकेच्या ‘आबाजी भूमकर शाळा’ भुमकर वस्ती येथे अजून एक कोरोना लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणीही यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी विशाल पवार- उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, मयुर जाधव – उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तसेचप्रतिक साळुंखे – सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button