breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड एसटी आगाराच्या सुरक्षेत वाढ

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारात काही दिवसापुर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर एसटी आगारातील गैरप्रकारासह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगार परिसरात होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता नवीन सुरक्षारक्षकांची वाढ केल्याने आगारातील सुरक्षारक्षकांची संख्या ११ वर पोहचली आहे. सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीमुळे आगारात प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण तयार होणार असून, परिसरात होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसणार आहे.

पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर एसटी आगाराच्या सुरक्षेत गेल्या आठ दिवसांपासून मोठी वाढ करण्यात आली आहे. आगार परिसरात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत होते. वल्लभनगर आगाराच्या सुरक्षा भिंती पडलेल्या आहेत. या भागात वेश्‍याव्यवसाय व गर्दुल्यांच्या पार्ट्या चालायच्या यामुळे रात्री उशिरा आगारात उतरणाऱ्या प्रवाशांना व मुक्कामी असणाऱ्या चालक-वाहक याचा मोठा त्रास होत होता. याबाबत आगार प्रमुख व स्थानक प्रमुखांनी स्थानिक पोलिसांना सुरक्षेसाठी वारंवार मागणी केली होती. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने पुणे विभागीय प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. याची दखल घेत पुणे विभागीय प्रशासनाने पाच जादा सुरक्षारक्षकांची आगारात नेमणूक केली आहे.

वल्लभनगर आगाराच्या सुरक्षेसाठी सध्या ११ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. त्यात एक सुरक्षारक्षक एसटी प्रशासनाचा आहे; तर दहा सुरक्षारक्षक कत्रांटी तत्वावर आहेत. आगारात दररोज सुमारे १७० बस मुक्कामी असतात. यामुळे येथील विश्रांतीगृहात मुक्कामी चालक-वाहकांची संख्या तीनशेपर्यंत असते. चालक-वाहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथील आगार प्रशासनाने स्थानिक पोलिसांना आगार परिसरात चालणाऱ्या गैरप्रकारांची माहिती दिली होती. तसेच, सुरक्षा पुरविण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर एसटीकडूनच सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button