पिंपरी / चिंचवड

सराफ दुकानावर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

भोसरी येथील एका सराफाच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई दरोडा विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 1) रात्री भोसरी येथे केली.

मोहबुल तय्यबअली शेख (वय 38), सईदहुसेन नूरइस्लाम शेख (वय 27),  मुजाहर इरफान शेख (वय 37), रेजाऊल रहामान शेख (वय 28, सर्व मूळ रा. झारखंड) आणि नूरइस्लाम मामलोदअली शेख (वय 29 मूळ रा. पश्चिम बंगाल. सर्व आरोपी सध्या रा. आळंदी चाकण रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी बुधवारी (दि. 2) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून दिघी रोड, भोसरी येथील सोलंकी ज्वेलर्स या दुकानावर दरोडा घालण्याचा डाव आखला. त्यासाठी आरोपी मंगळवारी रात्री भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाच्या शेजारील मोकळ्या जागेत जमले होते. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून स्पॅनर स्क्रू ड्रायव्हर, बोर कटर, कटावणी आणि मोबाईल फोन असा एकूण 56 हजार 950 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button