ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

8 गुन्ह्यात, 8 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपळे सौदागर मधून अटक

पिंपरी चिंचवड| वेगवेगळ्या आठ गुन्ह्यात मागील आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट चारने पिंपळे सौदागर मधून अटक केली आहे. आरोपी गुन्हा करुन आपल्या मुळगावी बिहार येथे पळून गेला होता. तो परत पुण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.दयानंद झा (रा‌. बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दयानंद झा परत पुण्यात आल्याची माहिती युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. आरोपी चिखली, पिंपरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार तपास सुरू केला. चौकशीअंती आरोपी पिंपळे सौदागर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे-2 लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक शोभा क्षिरसागर, पोलीस उप निरीक्षक जयदिप पाटील, पोलीस अंमलदार राजस शेख, दिपक भुजबळ, प्रविण भालचिम, प्रविण कराळे, शितल शिंदे, महेंद्र पवार, स्वप्निल कांबळे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button