breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारण

चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी…! आता तर राऊतांनीही केली मागणी, लढत की बिनविरोध?

पुणे : अजित पवार, जंयत पाटील आणि सुनील तटकरे काल रात्री मातोश्रीवर आले होते. आम्ही या दोन पोटनिवडणुकीवर काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा केली. उद्या त्यावर पुन्हा निर्णय घेऊ. निवडणुक लढलीच तर जी चिंचवडची जागा ती शिवसेनेने लढवावी असं आमचं मतं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतरची जागा सेनेने लढवावी असं आमचं मत आहे. कसब्याबाबत राष्ट्रवादी निर्णय घेईल, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात एक संस्कृती पहिल्यापासून राहिलेली आहे. एखाद्या जागेवर सदस्यांचं निधन झालं तर त्याबाबत सगळेच जण सहकार्य करीत असतात अन् ती निवडणुक ही बिनविरोध होते. यांचं उत्तम उदाहरण म्हणून आपण अंधेरीची पोटनिवडणुक पाहिली आहे. अनेक नेत्यांनी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी , म्हणून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने या पोटनिवडणुकीला विरोध केला नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सध्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, अन् त्या संस्कृतीची पायमल्ली कशी होते, ते कुणी सांगण्याची गरज नाही. पंढरपुर आणि नांदेडच्या पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही. अंधेरीत दिसली परंतु त्याला वेगळी कारणं होती, असा पलटवार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात आज ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमकं काय चर्चा होणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे. तर कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल. याची उत्सुकता सगळ्यांना आता लागूून राहिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button