पिंपरी / चिंचवड

जागेचा ताबा घेण्यासाठी टोळक्याचा राडा : नऊ महिलांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

जागेचा ताबा घेण्यासाठी बेकायदेशीरपणे जमाव जमवून नऊ महिलांनी दोघांवर दगडफेक केली. जागेच्या कंपाउंडचे लोखंडी गेट तोडून अनधिकृतपणे जागेत प्रवेश केला. याप्रकरणी पोलिसांनी नऊ महिलांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी अकरा ते दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास रावेत येथे घडली.

मोहम्मद तांबोळी (रा. देहूरोड), शफिक वजीरभाई मुलाणी (रा. कासारसाई, ता. मुळशी) आणि नऊ महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शिजो चेरियन (वय 36, रा. पिंपरी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद आणि शफिक यांच्या सांगण्यावरून आरोपी नऊ महिलांनी फिर्यादी यांच्या जागेचा ताबा घेण्यासाठी वॉल कंपाउंडच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून अनधिकृपणे जागेत प्रवेश केला. फिर्यादी आणि त्यांचे मालक आडसकर तिथे आले असता महिलांनी त्यांना दगड फेकून मारले. महिलांच्या तावडीतून सुटून पळून जात असताना फिर्यादी खाली पडले. त्यावेळी एका महिलेने त्यांना हातोडी फेकून मारली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button