breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळेसौदागरमध्ये पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमीपूजन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपळेसौदागरमधील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजित उद्यानाच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे तसेच रामनगर परिसरात अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २२) भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, भाजपचे स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शीतल काटे, रहाटणीचे नगरसेवक चंद्रकांत नखाते, नगरसेविका सविता खुळे, सुनीता तापकीर, प्रभाग स्वीकृत सदस्य संदिप नखाते, माजी नगरसेवक शंकर काटे, सह शहर अभियंता मकरंद निकम, रामदास तांबे, बबन झिंजुर्डे, कुंदा भिसे, भानदास काटे, जयनाथ काटे, शेखर कुटे, प्रकाश झिंजुर्डे, जगन्नाथ काटे, संजय भिसे, चंदा भिसे, सुभाष भिसे, मल्हारी कुटे, अरूण चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

रोझलँड रेसिडेन्सी शेजारील महापालिकेच्या नियोजित राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये २० दशलक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. सध्या पिंपळेसौदागर गावठाणातील एकाच टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागातील लोकसंख्या दहा वर्षापूर्वीच्या तुलनेत आता तिप्पट वाढली आहे. लोकसंख्या वाढली तरी पिण्याच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे पिंपळेसौदागरवासीयांसाठी पाणी प्रश्न गंभीर बनत चाललेला होता.

त्यामुळे पिंपळेसौदागरमध्ये पाण्याची टाकी उभारण्यात यावी, यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. नगरसेविका निर्मला कुटे या स्थायी समितीच्या सदस्या असताना पाण्याच्या टाकीसाठी पुरेशी तरतूद करून त्यांना समितीची मंजुरीही घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत पिंपळेसौदागरमध्ये पाण्याची टाकी उभारण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनीही पिंपळेसौदागरमध्ये पाण्याची टाकी उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. तसेच त्यांनी सोमवारी (दि. २१) नगरसेविका निर्मला कुटे यांच्या कार्यालयात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत मंगळवारी कामाचे भूमीपूजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून पाण्याची टाकी उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या पाण्याच्या टाकीची उंची २१ मीटर असणार आहे. ती उभारण्यासाठी सुमारे १ कोटी २३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कामासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीवरून वाकड -भोसरी बीआरटीएस रोड ते काटेवस्ती रोड, गणेशम फेज १, साई आर्केड, रोझआयकॉन, ट्रेजरी बेत, लक्षदीप पॅलेस, प्लानेट मिलेनियम सोसायटी, साई व्हिजन, साई अँबीयन्स सोसायटी या परिसराला पाणीपुरवठा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button