breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

महिला उद्योजकांसाठी ‘घे भरारी’ चे पिंपरी-चिंचवडमधिये प्रथमच प्रदर्शन!

दि. 3,4 आणि 5 फेब्रुवारी रोजी होणार हे प्रदर्शन

पिंपरी : नवव्यावसायिकांना आणि स्त्री उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘घे भरारी’ ने एका भव्य प्रदर्शन प्रथमच आकुर्डी येथे seasons banquet ला आयोजित केले आहे.

दि. 3,4 आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध व्यावसायिक अमित फटांगरे आणि आपला आवाज च्या संगीताजी तरडे यांच्या हस्ते झाले. सकाळी 11 ते रात्री 9 या वेळात नागरिकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे.

करोनाच्या काळात अनेक छोट्या व्यावसायिकांना खूपच आर्थिक फटका बसला आहे. त्यातून वर येऊन छोट्या व्यवसायिकाना एक व्यसपीठ मिळावे यासाठी ‘घे भरारी’ हा ग्रुप प्रयत्नशील असतो. ह्या प्रदर्शनात ६० पेक्षा जास्त छोटे व्यावसायिक व महिलांनी सहभाग घेतला आहे.

या प्रदर्शनात उत्तमोत्तम दागिने, कपडे, परफुम्स ,कुर्ती, पर्सेस, हातमागाच्या वस्तू, पादत्राणे, कालाकुसरीच्या वस्तू, साबणे, तांब्याच्या वस्तू, हस्तकलेच्या अनेक वस्तू, पिशव्या, टेराकोटा वस्तू, खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल येथे बघायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे भरपूर शाकाहारी गरमागरम पदार्थांची पर्वणी देखील या ठिकाणी असणार आहे.

एक उत्कृष्ट वीकेंड घालवण्यासाठी आकुर्डी, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी हे प्रदर्शन नक्कीच उत्साहवर्धक ठरेल यात शंकाच नाही. अनेक व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात त्यांनी मिळवलेले यश आणि त्यांच्या घे भरारीच्या साथीने झालेला प्रवास येथे बघता येईल. तेव्हा हे प्रदर्शन चुकवू नये, असे अमित फतांगरे यांनी म्हटले आहे.

या सर्व छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रदर्शनाला सर्वानी जरूर भेट द्यावी, असे संगीताजी म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button