breaking-newsआंतरराष्टीय

भारतासाठी वेगळा पर्याय शोधू – अमेरिकेची ग्वाही

  • इराणवरील निर्बंधांमुळे तेल आयातीवर होणार विपरीत परिणाम
  • 4 नोव्हेंबर पासून लागू होणार कडक निर्बंध

न्युयॉर्क – अमेरिकेने इराणवर लागू केलेले निर्बंध अत्यंत कडक स्वरूपात येत्या 4 नोव्हेंबर पासून लागू होंणार आहेत. त्यामुळे इराणहून कच्चे तेल आयात करण्यावरही मोठे निर्बंध येणार असल्याने भारतापुढे पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे, तथापी भारताची ही अडचण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अधिक चांगला पर्याय शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू असे अमेरिकेने म्हटले आहे.

इराणवरील निर्बंधांमुळे भारताच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

4 नोव्हेंबर पासून अमेरिकेचे इराणवरील निर्बंध अत्यंत कडक स्वरूपात लागू होणार आहेत. त्यामुळे त्या दिवसापासून इराणहून तेल आयात करणे भारताने पुर्ण पणे थांबवावे अशी सुचना अमेरिकेने भारताला केली आहे. तथापी अमेरिकेने लागू केलेल्या या निर्बंधांना संयुक्तराष्ट्रांची मान्यता नाही त्यामुळे भारताने हे निर्बंध पुर्णपणे मान्य करण्याची गरज नाही आणि भारताची हीच परंपरागत भूमिका राहिली आहे. पण अमेरिकेचे निर्बंध झुगारून भारताने इराणहून तेल आयात करणे सुरूच ठेवले तर भारतापुढे अमेरिकेकडून अडचणी आणल्या जाण्याची शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार आहे या विषयी औत्स्युक्‍य निर्माण झाले आहे. भारताची उर्जा गरज मोठी आहे. इराणकडून भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. ही आयात पुर्णपणे थांबवणे भारतासाठी अडचणीची ठरू शकते. तशातच भारताने इराणच्या चाबहार बंदराच्या विकासातही योगदान देण्याचा करार केला आहे. त्यामुळे अमेरिकेने लागू केलेल्या निर्बंधांचा या करारावरही विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button