breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मुंबई महापालिकेचा ५२,६१९ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबईकरांना दिलासा यावर्षी कोणतीही करवाढ नाही

मुंबई : देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला गेला. २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासन इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला.

मुंबई महानगरपालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रूपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान ७ हजार कोटी रूपयांनी अधिक आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंक्लपाचे आकारमान ४५,९४९ कोटी २१ लाख रूपये इतके होते. २०२३-२४ आकारमान ५२,६१९ कोटी ७ लाख रूपयांवर पोहोचले आहे.

नवीन करवाढीची कोणतीही घोषणा नाही. मात्र, सध्याच्या महसुली स्त्रोतांमधून महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्त्रोतांचा शोध घेणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर अर्थसंक्लपात भर देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button