पुणे-बंगळुरू महामार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ आज भीषण अपघात झाला आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. एका ट्रकने दुसऱ्या समोरील ट्रक व इको व्हॅनला धडक देऊन दोन ट्रक मुंबई लेनवर पलटी झाले आहेत. अपघातात दोन्ही ट्रक चालक जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वाहतुक विस्कळीत झाली आहे.
हेही वाचा – ‘संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’; चित्रा वाघ यांची टीका
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाकडील पोलीसअंमलदार व एन एच ए आय चे पेट्रोलिंग अंमलदार हेअपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून घेत आहेत, वाहन चालकांनी वाहने चालवताना योग्य ती दक्षता घ्यावी.
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) September 16, 2023
या अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीसांनी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान क्रेनच्या मदतीने ट्रक हटवण्याच काम सुरू करण्यात आले आहे. वाहन चालकांनी वाहने चालवताना योग्य ती दक्षता घ्यावी.