breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

“ज्यांच्याकडे डॉक्टरांचे प्रेस्क्रिप्शन आहे, अशा नागरिकांना मद्य द्यावे”

एकीकडे कोरोना विषाणूशी लढणाऱ्या केरळमधील मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या सरकारला आता सामाजिक आघाडीवरील एका नव्या प्रश्नाला तोंड द्यावे लागणार आहे… त्यासाठीच त्यांच्या सरकारने ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्री सुरू करता येईल का, यावर विचार सुरू केला आहे.

खुद्द मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषेदत या नव्या संभाव्य प्रश्नाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, अचानकपणे एके दिवशी मद्य मिळणे बंद झाल्यामुळे एक नवा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे काहीजणांना मद्याची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. त्यांनी राज्यातील उत्पादन शुल्क विभागाला काही निर्देशही दिले आहेत. ज्यांच्याकडे डॉक्टरांचे प्रेस्क्रिप्शन आहे, अशा नागरिकांना मद्य द्यावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

अचानक मद्य न मिळाल्यामुळे ज्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्यावर मोफत उपचार केले जावेत. गरज पडल्यास त्यांना व्यसनमुक्ती केंद्रातही दाखल केले जावे, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लॉकडाऊननंतर अचानक मद्य मिळणे बंद झाल्यामुळे केरळमध्ये अनेकांना त्रास होऊ लागला आहे. काही ठिकाणी आत्महत्येची प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळेच पिनरई विजयन यांनी ही पावले उचलली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button