breaking-newsराष्ट्रिय

गुजरात : मालगाडीच्या धडकेत 11 गायींचा मृत्यू, चौकशीचे आदेश

गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील दहेज गावाजवळ एका मालगाडीच्या धडकेत 11 गायींचा मृत्यू झाला, तर दोन गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी सरपंचाला दिली , त्यानंतर दहेज गावाच्या सरपंचांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. तक्रारीच्या आधारावर मालगाडीच्या मोटरमनकडे चौकशी होणार असल्याचं समजतं.

सोमवारी संध्याकाळी दहेज स्थानकापासून दीड किमी अंतरावर हा अपघात झाला. घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी मृत गायींचे शव हटवले आणि वाहतुकीसाठी रस्ता खुला केला. जवळपास अर्धातास रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता, त्यानंतर सेवा पूर्ववत झाली. या गायी कुणाच्या मालकीच्या होत्या? याबाबत चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच, अपघातावेळी मालगाडीचा मोटरमन कोण होता, त्या मोटरमनला गायींचा कळप कसा दिसला नाही याबाबत देखील चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर, पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी खेमराज मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघाताबाबत मालगाडीच्या मोटरमनने भरूच रेल्वे स्टेशन मास्तरांना कळवलं होतं. त्यानंतर आमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृत गायींचे शव हटवले अशी माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button