ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

तळेगावात ‘स्वच्छ तीर्थ’ मोहिम उत्साहात!

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने आयोजन, मोहीमेस शहरातील इतर सेवाभावी संस्थांनी देखील सहकार्य करावेः मुख्याधिकारी एन. के. पाटील

तळेगाव दाभाडे : केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारद्वारा १४ जानेवारी ते २१ जानेवारी २०२४ या सात दिवसीय कालावधीत शहरात “स्वच्छ तीर्थ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिले आहेत. मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात स्वच्छ तीर्थ मोहीम काटेकोरपणे राबविण्यात येत आहे. या स्वच्छ तीर्थ मोहीमेस शहरातील इतर सेवाभावी संस्थांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन मा. मुख्याधिकाऱ्यांनी तळेगाव दाभाडेवासियांना केले.

सदर मोहिमे अंतर्गत शहरातील सर्व धार्मिक स्थळे व धार्मिक स्थळाच्या आजूबाजूचा परिसर, उद्याने, मार्केटचा परिसर तसेच सार्वजनिक शौचालये इ. ठिकाणाची स्वच्छता करण्यात येणार आहे. दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार शहरातील डोळसनाथ महाराज मंदिर, कान्होबा मंदिर व शीतळा देवी मंदिर येथील स्वच्छता करून घेण्यात आली.

स्वच्छ तीर्थ मोहीमेत यांचा प्रामुख्याने सहभाग…

यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, उद्यान निरीक्षक सिद्धेश्वर महाजन, कर अधिकारी विजय शहाणे, मिळकत विभाग प्रमुख जयंत मदने, लेखापाल कैलास कसाब, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सुवर्ण काळे,  स्वच्छता निरीक्षक तुकाराम मोरमारे, लिपिक शीला वेहळे, रोहित भोसले, उद्यान समन्वयक रणजीत सूर्यवंशी, स्वच्छता सुपरवायझर पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे आणि शहर समन्वयक गीतांजली होणमने व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास विशेष उपस्थितांमध्ये माजी राज्यमंत्री संजय भेगडे, राज्य किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, माजी नगरसेविका शोभाताई भेगडे, माजी नगरसेवक अरुण भेगडे, माजी नगराध्यक्ष रवी भेगडे, सरोदे सर व सर्व ट्रस्टी होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button