ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

आमदार शेळके यांच्या प्रयत्नाने तळेगाव दाभाडे शहरातील पहिल्या टप्प्यातील १३ कोटी ३१ लक्ष निधींच्या विकासकामांचे भूमिपूजन

भूमिपूजन समारंभाला माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित

तळेगाव दाभाडेः

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 13 कोटी 31 लक्ष निधीतून तळेगाव दाभाडे शहरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी संपन्न झाला. यात शहरातील अठरा ठिकाणी भूमिपूजन झालेल्या या विकास कामांमध्ये शहरातील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, डांबरीकरण करणे, गार्डन विकसित करणे, आरसीसी गटार बांधणे इ .कामांचा समावेश आहे. या भूमिपूजन समारंभाला माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, स्वराज्य नगरी, शोभा नगरी, सर्व परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे भूमीपूजन करण्याचे हे फक्त निमित्त आहे. परंतु भूमिपूजनासोबत इतर काही समस्या आहेत. येथील स्थानिकांना काय काय अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, यातून मार्ग काढता येईल. ऑन दी स्पॉट समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. वाढत्या नागरिकीकरणामुळे लाईट, पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कायम प्रयत्नशिल असणार आहे. 6 महिन्यांचा आमदारकीचा कार्यकाळ शिल्लक आहे. येत्या चारच महिन्यांमध्ये सर्वच अंतर्गत रस्ते करण्यात येतील.

यावेळी बबनराव भेगडे, अंजलीराजे दाभाडे, सत्यशील दाभाडे, ॲड. रविंद्रनाथ दाभाडे, गणेश खांडगे, गणेश काकडे, सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके,संदिप शेळके, सुदर्शन खांडगे, संतोष शिंदे, रंजना भोसले,माया भेगडे, मंगल भेगडे, वैशाली दाभाडे,संगिता शेळके,नंदकुमार कोतुळकर, रामदास गवारे,अशोक भेगडे,अशोक काळोखे,संजय बाविस्कर,चंद्रकांत दाभाडे,विकी लोखंडे,आशिष खांडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

  • या कामांचे भूमिपूजन, खर्चाचा तपशील :

सूर्यकिरण फार्मसीजवळील रस्ते डांबरीकरण करणे ४९ लक्ष ६९ हजार,

शोभानगरीमधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे २२ लक्ष ५५ हजार,

गंगा रेसिडेन्सी येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे २५ लक्ष ९६ हजार,

अल्टीनो कॉलनीमधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे ७८ लक्ष ८४ हजार,

हरणेश्वर सोसायटीमधील उर्वरित रस्ते डांबरीकरण करणे २७ लक्ष ८७ हजार,

म्हाळसकरवाडी अंतर्गत रस्ता करणे १७ लक्ष ३५ हजार,

सरस्वती विद्या मंदिर शाळेसमोरील रस्ता डांबरीकरण करणे ४ लक्ष २६ हजार,

जय भवानी मार्केट ते श्री अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणे ३६ लक्ष ५१ हजार,

प्रतिकनगर ते मुख्य नाल्यापर्यंत ९०० मी.मी. व्यासाची आर.सी.सी.पाईप गटार करणे १ कोटी ५४ लक्ष ६५ हजार,

नाना भालेराव कॉलनी येथील रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी १३ लक्ष ६० हजार,

नाना भालेराव कॉलनी ते म्हाडा कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे ४४ लक्ष २४ हजार,

श्रीरंग विहार सोसायटी अंतर्गत आर.सी.सी. पाईप टाकणे ५ लक्ष ७४ हजार,

म्हाडा सोसायटी ते निर्मिती सोसायटीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे १७ लक्ष ९३ हजार,

मनोहरनगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे १ कोटी ८२ लक्ष,

रेनो कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे ५० लक्ष,

नम्रता साकार सोसायटीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे २२ लक्ष ८८ हजार,

योजनानगर सोसायटी लेन २ कनल यांचे घर ते कारंडे घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे १६ लक्ष ८७ हजार,

बेथानी सोसायटीजवळील रस्ता डांबरीकरण करणे २२ लक्ष ९५ हजार,

इंद्रायणी कॉलनी ओपन स्पेस येथील गार्डन विकसित करणे २२ लक्ष ६८ हजार,

अंबिका गार्डन विकसित करणे १६ लक्ष ६७ हजार,

मुख्य रस्ता ते सुशिल डेकोरेटर्सपर्यंत रस्ता करणे – २९ लक्ष ६७ हजार

बालविकास शाळा आणि पारिजात सोसायटी रस्ता डांबरीकरण करणे -४२ लक्ष ९६ हजार

डोळसनाथ मंदिर ते कुंभार आळी ते भेगडे आळी पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ४६ लक्ष ७३ हजार,

खळदे आळी रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ५८ लक्ष ७९ हजार,

संताजीनगर येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे १५ लक्ष ८७ हजार,

कृष्णा निवास ते मारुती मंदिरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे ३१ लक्ष,

चंदू वडेवाले ते म्हाडा कॉलनी ते हॅप्पी सिटी अंतर्गत रस्ते करणे १ कोटी ८९ लक्ष ७४ हजार,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button