ताज्या घडामोडीमनोरंजन

प्रियांका चोप्रा पेरू विकणाऱ्या महिलेकडून प्रभावित

सध्या एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी २९' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात

ओडिशा : ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. ती एसएस राजामौली आणि महेश बाबू यांच्या बहुप्रतिक्षित ‘एसएसएमबी 29’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. शूटिंग दरम्यान, प्रियांका भारतात वेळ घालवत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ओडिशामध्ये सुरू होतं आणि आता असं सांगितले जात आहे की ओडिशामध्ये असणारं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

पेरू विकणाऱ्या महिलेनं प्रियांकाला प्रभावित केलं
ओडिशामधील शूटिंग पूर्ण केल्यानंतर प्रियांका आता मुंबईत पोहोचली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने ओडिशातील ताला माली हिलटॉपचे काही फोटो शेअर केले आहेत. जिथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. मात्र शूटिंगदरम्यान एक किस्सा असा घडला कि त्यामुळे प्रियांका फारच प्रभावित झालेली पाहायला मिळत आहे. प्रियांकाला प्रभावित करणारी एक पेरू विकणारी महिला आहे.

प्रियांकाने एक व्हिडिओ देखील शेअर केला ज्यामध्ये ती याच पेरू विकणाऱ्या महिलेबद्दल बोलताना दिसत आहे. त्या महिलेच्या प्रामाणिकपणाने प्रियांकाचं मन जिंकलं आहे. शेवटी न राहवल्यामुळे प्रियांकाने चक्क उडत्या विमानातून या महिलेसाठी एक खास व्हिडिओ बनवला.

हेही वाचा –  देवगड आंब्यावर टँपर प्रूफ युआयडी

व्हिडीओद्वारे प्रियांकाने सांगितला तो किस्सा
प्रियांकाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. तिने तिच्या पोस्टमध्ये शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये ती पेरू विकणाऱ्या एका महिलेचे कौतुक करताना दिसत आहे. ती म्हणाली की, “आज मला खूप प्रेरणा मिळाली. मी मुंबईला जाण्यासाठी विशाखापट्टणम विमानतळावर जात होते आणि तेथून न्यू यॉर्कला जात होते. मग मी एका महिलेला पेरू विकताना पाहिलं. मला कच्चे पेरू खूप आवडतात आणि मी त्या महिलेला विचारलं की ती पेरू कितीला विकत आहे? उत्तर मिळाले 150 रुपये. मी तिला 200 रुपये दिले. तिने तिच्याकडे 50 सुट्टे नव्हते”

महिलेच्या प्रामाणिकपणाने जिंकलं प्रियांकाचे मन
प्रियांका पुढे म्हणाली, “मी त्या महिलेला उरलेले 50 रुपये तिच्याजवळच ठेवण्यास सांगितले. पण तिने तसं केलं नाही आणि कुठेतरी पैसे घेण्यासाठी गेली पण कदाचित तिला सुट्टे पैसे न मिळाल्याने तिने परत आल्यावर मला आणखी दोन पेरू दिले. ती एक कष्टकरून आपलं काम चोख करणारी महिला आहे आणि तिला असेच पैसे नको होते ही गोष्ट मला खूप भावली” या व्हिडिओद्वारे प्रियांकाने या महिलेच्या प्रामाणिकपणावर भाष्य केलं आहे तसेच तिच्या प्रामाणिकपणाचा तिच्यावर प्रभाव पडल्याचंही तिने सांगितलं

1000 कोटींचा चित्रपट
दरम्यान प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास एसएसएमबी29 चे बजेट हे 1000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे. हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट ठरेल असं म्हटलं जातं. यामध्ये प्रियांका महेश बाबूसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. पृथ्वीराज सुकुमारन देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button