ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटा मधील बलात्काराच्या सीनबद्दल गोविंद नामदेव यांचा खुलासा

मोठ्या कलाकाराकडून कामात सहकार्य मिळतं, तेव्हा दोघं पडद्यावर 100 टक्के चांगली कामगिरी करू शकतात.

मुंबई : राजीव कपूर दिग्दर्शित ‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेते ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका होत्या. थॉमस हार्डी यांच्या ‘टेस ऑफ द डर्बनविलेस’ या इंग्रजी कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटातील एका सीनमुळे हा चित्रपट त्यावेळी खूप चर्चेत आला होता. माधुरीवरील लैंगिक शोषणाचा हा सीन होता. अभिनेते गोविंद नामदेव आणि माधुरी यांच्यात हा सीन चित्रित करण्यात आला होता. आता बऱ्याच वर्षांनंतर गोविंद नामदेव हे त्या सीनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की, माधुरीसोबत तो सीन शूट करताना ते खूप घाबरले होते.

दिलेल्या मुलाखतीत गोविंद नामदेव यांना माधुरीसोबतच्या या सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “याबाबतीत मी माधुरीचा चाहता झालो होतो. आधीच दबावाखाली असलेल्या एखाद्या कलाकाराला जेव्हा इतक्या मोठ्या कलाकाराकडून कामात सहकार्य मिळतं, तेव्हा दोघं पडद्यावर 100 टक्के चांगली कामगिरी करू शकतात. सहसा असं होताना दिसत नाही. मात्र माधुरीच्या व्यक्तीमत्त्वाचं वलयच खूप वेगळं आहे. तिने सुरुवातीपासूनच खूप सहकार्य केलं.”

हेही वाचा –  कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली

तिच्या वागण्या-बोलण्यामुळे मी कम्फर्टेबल होऊ शकलो. आम्ही सर्वांत शेवटी तो सीन शूट केला होता. मी हात जोडून माधुरीला म्हणालो, ‘मी हा सीन करायला जातोय.’ त्यावर ती मला ‘हो, ठीक आहे’ असं म्हणायची. मी घाबरत होतो कारण काही बरंवाईट होऊ नये. नंबर वन हिरोइनसोबत इतका मोठा सीन शूट करताना काही चूक होऊ नये म्हणून मी चिंतेत होतो. कारण त्यामुळे सहकलाकार म्हणून आमचं नातं कायमचंच बिघडू शकतं, असं त्यांनी पुढे सांगितलं.

गोविंद नामदेव हे बॉलिवूडमध्ये त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठीच ओळखले जातात. त्यांनी डेविड धवन यांच्या ‘शोला और शबनम’ या चित्रपटातून 1992 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘सरफरोश’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘दम मारो दम’, ‘सत्या’, ‘ओएमजी- ओह माय गॉड’, ‘ओएमजी 2’, ‘सॅम बहादूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button