‘हाऊसफुल 5’ चा ट्रेलर लॉन्च, नाना पाटेकरांनी पत्रकाराला फटाकरलं
‘हिंदीत बोलं रे, मला इंग्रजी येत नाही’

मुंबई : प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या हाऊसफुलच्या 4 भागांनंतर आता ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. चित्रपटाच्या ट्रेलरनं सोशल मीडियावर आता धुमाकूळ घातला आहे. जवळपास चित्रपटातील सर्वच कलाकारांनी ट्रेलर लॉन्च कार्यक्रमातउपस्थिती दर्शवली होती.
आता या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे. एका पत्रकाराबरोबर संवाद साधतानाचा हा व्हिडीओ आहे. नाना पाटेकर हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना नाना पाटेकरांनी त्यांच्या स्टाईलने एका पत्रकाराला चांगलच उत्तर दिलं आहे. त्यांच्या या उत्तरानंतर सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला दादही दिली. ‘हाऊसफुल 5’च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात एका पत्रकारानं नानांना इंग्रजीमध्ये एक प्रश्न विचारला. यानंतर नाना एक असं उत्तर दिलं, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण जोरदार हसू लागले.
हेही वाचा – …मी पहाटेचा शपथविधी आणि ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद विसरू शकत नाही, देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?
नाना पाटेकरचा व्हिडिओ झाला व्हायरल
पत्रकाराने प्रश्न विचारताच नानानी प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, “मला अजिबातच इंग्रजी येत नाही, हिंदीमध्ये प्रश्न विचार…” नानांच्या या उत्तरानंतर उपस्थित सर्वजणच जोरात हसू लागले. नाना पाटेकरांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नानाच्या या व्हिडिओवर अनेक यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं आहे, ‘नाना रॉक मीडिया शॉक.’ दुसऱ्या एकानं लिहिलं, ‘संपूर्ण चित्रपटाच्या कास्टमध्ये नाना पाटेकर उत्तम आहे.’ आणखी एकानं लिहिलं, ‘उदयभाईबरोबर पंगा घेऊ नका’ याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून नाना पाटेकरचं कौतुक करत आहेत.
‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची स्टार कास्ट
दरम्यान ‘हाऊसफुल 5’या चित्रपटामध्ये नाना पाटेकर व्यतिरिक्त अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, सोनम बाजवा, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लीव्हर, आणि डिनो शर्मा हे स्टार्स दिसणार आहेत. ‘हाऊसफुल 5’मध्ये नाना पाटेकर एका महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा खूप कॉमेडी आहे. दरम्यान ‘हाऊसफुल 5’ चित्रपट 6 जून रोजी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल असं सध्या दिसत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नाना पाटेकर हटके अंदाज आणि देसी लूकमध्ये दिसत आहे.