Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

हर हर महादेव! ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; १ मे रोजी चित्रपट प्रदर्शित

Raja Shivaji Teaser | “हर हर महादेव”च्या जयघोषात दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून या चित्रपटासाठी मेहनत घेणाऱ्या रितेशने आता प्रेक्षकांसमोर पहिली झलक सादर केली असून टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

‘धुरंधर २’च्या स्क्रिनिंगदरम्यान प्रेक्षकांना रितेशच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर पाहायला मिळतो. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘राजा शिवाजी’ चित्रपट देशभरात सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझरमध्ये दमदार संवाद, हिंदवी स्वराज्याची झलक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून त्यांचा लूक पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. तसेच जिनिलिया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार असून तिचा मराठमोळा अंदाज टीझरमध्ये विशेष लक्ष वेधून घेतो.

हेही वाचा      :                जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर इराणचा मिसाईल हल्ला 

चित्रपटात अभिनेते महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले, भाग्यश्री राजमाता जिजाऊ, तर अभिषेक बच्चन संभाजीराजे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय संजय दत्त, सचिन खेडेकर, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि विद्या बालन यांसारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

संगीतकार अजय-अतुल यांचं दमदार संगीत या चित्रपटाला लाभलं असून टीझरच्या शेवटी ऐकू येणारं “छत्रपती” गाणं विशेष आकर्षण ठरत आहे. भव्य सेट, प्रभावी दृश्यरचना आणि ताकदीची स्टारकास्ट यामुळे ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button