ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक वापर व अस्वच्छतेवर महापालिकेची कडक कारवाई!

२१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

पिंपरी | सिंगल यूज प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी गंभीर धोका ठरत असून, वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने ब क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक १७ अंतर्गत विविध ठिकाणी कारवाई करीत २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कडक मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १७ येथे सार्वजनिक ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणारे तसेच अस्वच्छता पसरविणारे नागरिक आणि व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली. प्लास्टिकचा वापर, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे व थुंकणे या प्रकारांबाबत दंड आकारण्यात आला.

हेही वाचा       :              पिंपरी चिंचवडमध्ये ‘वेस्ट टू आर्ट’चा अनोखा उपक्रम

या कारवाईमध्ये ५ हजार रुपयांची ३ प्रकरणे, २ हजार रुपयांचे १ प्रकरण, १ हजार रुपयांची ४ प्रकरणे आणि ५०० रुपयांचे १ प्रकरण अशा एकूण ९ प्रकरणांमध्ये एकूण २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य निरीक्षक रुपाली साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सातत्याने अशी कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा व स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

वसुंधरेचे संरक्षण आणि शहराची स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे आवश्यक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेकडून यापुढेही कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button