शाहरुख खानच्या ६०व्या वाढदिवशी ‘KING’ ची पहिली झलक; चाहत्यांमध्ये आनंदाचा जल्लोष!

King Title Reveal | बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान काल आपल्या ६०व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी एक खास भेट घेऊन आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या ‘किंग’ या सिनेमाची पहिली झलक अखेर प्रदर्शित करण्यात आली आहे, आणि ती पाहताच सोशल मीडियावर SRK चाहत्यांनी अक्षरशः जल्लोष सुरू केला आहे.
या चित्रपटात शाहरुख खान ‘अंडरवर्ल्डचा किंग’ अशी गूढ, प्रभावी भूमिका साकारत आहे. याच कारणामुळे चित्रपटाचं नाव ‘किंग’ असं ठेवण्यात आलं आहे. चित्रपटात शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ‘किंग’चा दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून, हा चित्रपट करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शन आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या संयुक्त निर्मितीत तयार होत आहे.
हेही वाचा : ‘महापालिका निवडणुका १ जानेवारीला’, दिलीप वळसे पाटलांच्या दाव्याने खळबळ
शाहरुख खानने यापूर्वी मुलगा आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या प्रमोशनसाठी हाताला दुखापत असूनही उपस्थिती लावून चर्चेचा विषय निर्माण केला होता. आता तो मुलगी सुहाना खानला पुन्हा नव्या जोमात बॉलीवूडमध्ये लाँच करण्यासाठी स्वतः पुढाकार घेत आहे. सुहानाने ‘द आर्चिज’ सिनेमातून पदार्पण केलं होतं, मात्र त्या चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं.




