ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक! गेमच्या वादातून अल्पवयीन मुलाचा खून

पिंपरी नेहरूनगर येथील प्रकार

पिंपरी चिंचवड : बिझनेस गेम खेळत असताना झालेल्या वादातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला रस्त्यावर खाली पाडून डोक्यावर व तोंडावर लाथा मारून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. ३) पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली. गणेश नागनाथ कुर्‍हाडे (वय १६, रा. विजयप्रभा हौसिंग सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. त्याचे वडील नागनाथ अर्जुन कुर्‍हाडे (वय ४२) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोहेब हबीब शेख (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी) याला पोलीसांनी अटक केली आहे.

हेही वाचा –  सोमवारी जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठल्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल?

मृत गणेश याने दहावीची परिक्षा दिली होती. तर, आरोपी सोहेब याने बारावीची परिक्षा दिली आहे. फिर्यादी नागनाथ यांचा १४ वर्षीय मुलगा कार्तिक आणि आरोपी सोहेब हे शनिवारी (दि. ३) बिझनेस नावाचा गेम खेळत होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढत गेला. कार्तिक याने आपला भाऊ गणेश याला बोलविले. गणेश याने आरोपी सोहेब याला याबाबत जाब विचारला. त्यावेळी संतप्त झालेल्या आरोपी सोहेब याने कार्तिकचा भाऊ गणेश याच्याशी भांडण करीत त्याला सिमेंटच्या रस्त्यावर खाली पाडून डोक्यावर व
तोंडावर लाथा मारून त्याचा खून केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार
तपास करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button