९८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा: ‘वन बॅटल आफ्टर अनदर’चा दबदबा; ६ पुरस्कारांची कमाई

98th Oscars Winners | लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. यावर्षी दिग्दर्शक Paul Thomas Anderson यांच्या One Battle After Another या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण ६ पुरस्कार जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.
सिनेविश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या Academy Awards सोहळ्यात या चित्रपटाने Best Picture सोबतच दिग्दर्शन, पटकथा आणि संकलनासह अनेक श्रेणींमध्ये विजय मिळवला. त्यामुळे हा चित्रपट यंदाचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.
दरम्यान, Michael B. Jordan याला Sinners या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (Best Actor) पुरस्कार मिळाला. त्याने या शर्यतीत Timothée Chalamet आणि Leonardo DiCaprio यांसारख्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकले.
तसेच Jessie Buckley हिने Hamnet या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे, हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली आयरिश अभिनेत्री ठरली आहे.
हेही वाचा : शहर सुरक्षेसाठी नगरसेविका कविता भोंगाळे यांचा सर्वसाधारण सभेत पाठपुरावा!
९८ व्या ऑस्करचे प्रमुख विजेते
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Picture) – One Battle After Another
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor) – Michael B. Jordan (Sinners)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress) – Jessie Buckley (Hamnet)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Best Director) – Paul Thomas Anderson (One Battle After Another)
- सर्वोत्कृष्ट गाणे (Best Song) – Golden (K-Pop Demon Hunters)
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट (Best International Feature Film) – Sentimental Value
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – Autumn Durald Arkapaw
- सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग – Andy Jurgensen
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर – K-Pop Demon Hunters
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म – The Girl Who Cried Pearls
- सर्वोत्कृष्ट साउंड – F1
- सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर – Sinners
- सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाईन – Frankenstein
- सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईलिंग – Frankenstein
- सर्वोत्कृष्ट कास्टिंग – Cassandra Kulukundis (One Battle After Another)
या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात ‘Sinners’ आणि ‘One Battle After Another’ या चित्रपटांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. Sinners चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती, तर One Battle After Another ने सर्वाधिक पुरस्कार जिंकत ऑस्कर २०२६ मध्ये आपला ठसा उमटवला.





