ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहर सुरक्षेसाठी नगरसेविका कविता भोंगाळे यांचा सर्वसाधारण सभेत पाठपुरावा!

शॉप ॲक्ट नोंदणी दोन CCTV कॅमेरे बंधनकारक करा

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

शहरातील व्यापारी आस्थापनांच्या सुरक्षेसाठी दुकाने अस्थापना नोंदणी (Shop Act) व नूतनीकरण करताना किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घ्यावा, अशी आग्रही मागणी भाजपा नगरसेविका कविता भोंगाळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. शहरातील नागरिक तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे मांडले.

शहरात सध्या 30 हजारांहून अधिक व्यावसायिक आस्थापना कार्यरत आहेत. या सर्व आस्थापनांनी Shop Act अंतर्गत नोंदणी करताना किंवा परवाना नूतनीकरण करताना किमान दोन CCTV कॅमेरे बसवणे अनिवार्य करावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडेकेली.

हेही वाचा      :            पुनावळे येथील वाहतूक कोंडी-धुळीच्या समस्येची महापौरांकडून पाहणी! 

या संदर्भात बोलताना नगरसेविका भोंगाळे म्हणाल्या की, प्रत्येक दुकानाच्या प्रवेशद्वारावर एक CCTV कॅमेरा आणि दुकानाच्या आतील व्यवहाराच्या ठिकाणी दुसरा कॅमेरा बसवणे बंधनकारक केले पाहिजे. शहरातील सर्व आस्थापनांमध्ये CCTV कॅमेरे बसवले गेले तर हजारो कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात एक मजबूत सुरक्षा जाळे तयार होईल. यामुळे चोरी, वाहनांची तोडफोड तसेच इतर गुन्हेगारी घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल. तसेच कोणतीही घटना घडल्यास पोलिस तपासासाठी महत्त्वाचे CCTV फुटेज उपलब्ध होऊन गुन्ह्यांचा तपास अधिक वेगाने होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

नागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य…

तसेच, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे सांगत पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, प्रशासनाने या संदर्भात तातडीने धोरण तयार करून Shop Act परवाना देताना तसेच नूतनीकरण करताना दोन CCTV कॅमेरे बसवण्याची अट बंधनकारक करण्याचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नगरसेविका कविता भोंगाळे यांनी सभागृहात केली आहे.

पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात नागरिकांची आणि विशेषतः महिलांची सुरक्षा ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शहरातील प्रत्येक व्यावसायिक आस्थापनात CCTV कॅमेरे बसवले गेले तर केवळ गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणेच शक्य होणार नाही, तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना देखील निर्माण होईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी Shop Act नोंदणी आणि नूतनीकरणावेळी दोन CCTV कॅमेरे बंधनकारक करण्याचा निर्णय प्रशासनाने तातडीने घ्यावा, हीच आमची अपेक्षा आहे.

– कविता भोंगाळे, नगरसेविका, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button