breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

एलॉन मस्कचा नवा अविष्कार, मानवाच्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसवली चिप!

Elon Musk | एलॉन मस्क यांनी एक नवा इतिहास रचला आहे. जगात पहिल्यांदाच एक व्यक्तीच्या मेंदुमध्ये चीप बसवण्यात आली आहे. या चिपद्वारे शरीरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. न्यूरोलिंक कंपनीचे संस्थापक आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांनी यासंदर्भातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे.

माणसांच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर ते अनेक गोष्टी करू शकतील जे ते सामान्यपणे करू शकत नाहीत. अवयवांवर नियंत्रण गमावलेल्या लोकांना चिप इम्प्लांटचा फायदा होऊ शकतो असा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा    –    अजित पवारांसमोर हसन मुश्रीफांना अश्रू अनावर; म्हणाले..

न्यूरॉन्स हे असे सेल्स असतात जे इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नलचा वापर करुन मेंदू आणि शरीरात माहिती पोहोचवत असतात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मागील वर्षी न्यूरालिंक कंपनीला चिप मेंदूमध्ये बसवण्याचा प्रयोग करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर एका पॅरालिसिस झालेल्या रग्णावर चाचणी घेण्याची त्यांना परवानगी मिळाली आहे आणि शरीर निकामी झालेल्या किंवा पॅरोलेसिस झालेल्या रुग्णांसाठी हे एक वरदान ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button