breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

The Real Warrior : कोरोना विरोधात लढणा-या महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांचा भारतीय सैन्यदलाच्या वतीने सन्मान

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाला हरविण्यासाठी व कोवीड १९ वर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी नियोजन करून अंमलबजावणी करणाऱ्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व कोरोना रूग्णांवर रूग्णालयात उपचार करणाऱ्या महापालिकेच्या डाॅक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांना “कोरोना वाॅरियर्स” म्हणून गौरविण्यात आले. बाॅम्बे इंजिनिअरींग ग्रूपचे प्रमुख स्टेशन कमांडंट ब्रिगेडीअर सेना मेडल एम. जे. कुमार यांनी सैन्यदलाच्या वतीने केक कापून व मिठाई देवून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला.

महानगरपालिका भवनात येवून कुमार यांच्या पथकाने आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ. के. अनिल राॅय,अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ पवन साळवे, वैद्यकिय अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे, डाॅ. वर्षा डांगे, डाॅ. प्रविण सोनी, डाॅ. अनिकेत लाठी, डाॅ. लक्ष्मण गोफणे, डाॅ. शैला भावसार, डाॅ. जाॅन, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button