breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठा आरक्षणानंतर धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी लढणार; मनोज जरांगे पाटील म्हणाले..

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना जरांगेंनी धनगर आणि मुस्लीम समाजाने मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. हा आरक्षणाचा प्रश्न सुटला की, धनगर आणि मुस्लीम बांधवांना आरक्षण कसं देत नाहीत तेच बघतो. त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे असं माझं मत आहे. पण, त्यांनीही म्हटलं पाहिजे हा प्रश्न सुटला पाहिजे. धनगर बांधव आणि मुस्लीम बांधव म्हणाला तर मग, मी पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही असं म्हटलं आहे.

हेही वाचा    –    एलॉन मस्कचा नवा अविष्कार, मानवाच्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसवली चिप!

मराठा आरक्षणासाठी आम्ही भांडत राहणार, बोलत राहणार आहे. ज्यावेळी मराठा समाजाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होईल तेव्हा गुलाल उधळला जाईल आणि महादिवाळी साजरी केली जाईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणाच्या बाजूचे नाहीत. ते सत्याच्या बाजूने उभे राहणार. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे सहाजिकच त्यांना साथ द्यावी लागेल. माझ कोणाबरोबरही राजकीय वैर नाही. मी मुंबईवरुन परत आलो, त्याचवेळी सगळ्या गोष्टी तिथे सोडून आलो. जातीसाठी भांडण, संघर्ष आवश्यक होता, म्हणून केला. यापुढे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणी काही बोललं, तर त्याला मात्र उत्तर देणार, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button