Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

महिलेने उत्तेजक कपडे घातले होते, त्यामुळं…; न्यायालयाकडून आरोपीला जामीन

कोझिकोडः महिलेने परिधान केलेल्या वस्त्रांवर सवाल उपस्थित करून केरळमधील न्यायालयाने लैंगिक छळाचा संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीला दिलासा दिला आहे. या संशयित आरोपीचा जामीन कोर्टाने मंजूर केला आहे.

एका ७४ वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्याविरोधात महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. कोझिकोड जिल्हा सत्र न्यायालयाने मात्र सकृतदर्शनी पुराव्यांच्या आधारे सदर व्यक्तीवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. महिलेने उत्तेजक कपडे घातलेले असल्यास लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे असून महिलेला फटकारले आहे. न्यायालयाने नोंदवलेले मत आता चर्चेचा मुद्दा बनले आहे. सिविक चंद्रन असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीच्या वकिलांनी बाजू मांडताना हा केवळ बदल्याच्या इराद्याने दाखल केलेला गुन्हा असल्याचे म्हटले आहे.

न्यायालयाचे म्हणणे काय?

– आरोपी चंद्रन यांच्या वतीने सादर करण्यात आलेले पुरावे, फोटो यांवरून दिसते, की तक्रारदार पीडित महिलेने उत्तेजित करणारे कपडे परिधान केले होते. त्यामुळे आरोपीवर ‘३५४ अ’ कलम लागू होत नाही.

– ७४ वर्षांची व्यक्ती शारीरिकदृष्ट्या दुर्बल असते. त्यामुळे आरोपीने पीडितेवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणे अशक्य. या घटनेवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.

महिलेची तक्रार काय?

– आरोपीकडून तोंडी आणि शारीरिक लैंगिक छळ

– २०२०मध्ये समुद्रकिनारी आयोजित शिबिरामधील घटना

– महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल केला.

– आरोपीच्या वतीने पी. हरी आणि सुषमा एम. यांनी युक्तिवाद केला. महिलेने दाखल केलेला गुन्हा खोटा असून, घटनेनंतर जवळपास सहा महिन्यांनी तो नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे कारण फिर्यादीने स्पष्ट करावे, असा युक्तिवादही करण्यात आला आहे.

– तक्रारकर्त्या महिलेने प्रियकरासमवेतचा फोटो सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये ते दोघेही समुद्रकिनाऱ्यावर बसल्याचे दिसून आले आहे. असेही आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button