breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बृषभूषण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवले

तब्बल सात तासाच्या बैठकीनंतर क्रीडा मंत्र्यांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दणका बसला आहे. सात तासांच्या बैठकीनंतर अखेर बृषभूषण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. चौकशीपूर्ण होईपर्यंत बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे.

बृजभूषण सिंह यांची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली जाईल. या समितीतील सदस्यांची नावे सकाळी घोषित केली जातील. ही समिती चार आठवड्यात आपली चौकशी पूर्ण करेल. डब्लूएफआय आणि त्याच्या प्रमुखाच्या विरोधातील सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जाईल. तोपर्यंत बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर केले जात आहे. चौकशी होईपर्यंत सिंह हे अध्यक्षपदाच्या दैनिक कार्यापासून दूर राहतील आणि चौकशीला सहकार्य करतील, असं क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

आम्ही तब्बल सात तास चर्चा केली. यावेळी कुस्तीपटूंनी कुस्ती संघावरील आरोपांची माहिती दिली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकण्यात आल्या आहेत. खेळाडूंच्या आरोपानंतर आम्ही डब्ल्यूएफआयला नोटीस बजावली होती. ७२ तासांत नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले होतं, असंही म्हणाले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कुस्ती संघाचे अध्यक्ष हे अध्यक्षपदाच्या दैनिक कार्यापासून दूर राहतील आणि चौकशीला सहकार्य करतील, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.

यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनीही मिडीयाशी संवाद साधला. चौकशी निष्पक्ष होईल अशी आम्हाला आशा आहे. केंद्रीय क्रीडा मंत्र्याने आमच्या मागण्या ऐकल्या आणि योग्य ते आश्वासन दिलं आहे. आम्ही त्याचे आभार मानतो. त्यामुळेच आम्ही आमचं आंदोलन मागे घेत आहेत, असं कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button