breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘शरद पवारांनी उद्या भाजपचे समर्थन केले तर आश्चर्य वाटू नये’; भाजप नेत्याचे विधान

शिर्डी: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासंदर्भात ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, हे महाविकास आघाडी नाही तर हे महाभ्रष्टाचारी सरकार आहे.

परिवहन मंत्र्यावर पडलेल्या छाप्याची गाडी किती दूर जाईल माहीत नाही, असे सूचक विधान विखे पाटलांनी केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय इडीची कारवाई होत नाही. नवाब मलिकांच्या प्रकरणावरून हे सिद्ध झाले आहे. दाऊद इब्राहिमशी संबध असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. मात्र तरीही जाणते राजे म्हणताहेत माझा त्यांच्यावर विश्वास आहे. अतिरेकी कारवाईचे समर्थन केले जात आहे, हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे, अशी घणाघाती टीका विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. (radhakrishna vikhe patil criticizes ncp leader sharad pawar)

ज्ञानवापी मशीद आणि मंदिरासंदर्भात सुरू असलेल्या वादावरून भाजप देशात जातीवाद पसरवत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा देखील विखे पाटलांनी समाचार घेतला आहे. २०१४ साली मतमोजणी सुरू असतानाच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता याची आठवण करून देत, तेंव्हा यांना भाजप जातीवादी वाटले नाही, असे विखे म्हणाले. शरद पवारांना सोयीप्रमाणे भूमिका बदलतांना जनतेने बघितले आहे. काळाच्या ओघात ते उद्या भाजपचे समर्थन करायला लागले तर आश्चर्य वाटू नये, असा टोला देखील विखे पाटलांनी शरद पवारांना लगावला आहे.

हे सरकार समान विकास कार्यक्रमावर एकत्र आले नाही, तर समान लुटीच्या कार्यक्रमावर आले आहे, अशा शब्दात विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात फक्त लूट सुरू असून राज्यातील सामान्य जनता याचे परिणाम भोगत आहे. सरकारने लोकांचा अधिक अंत पाहू नये. सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवून देत मुख्यमंत्र्यांनी आपला दर्जा टिकवला पाहिजे. मात्र राज्याचे नेतृत्वच असंवेदशील झाले आहे, अशी टीका विखे पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. अनिल परब यांच्या संदर्भातील कारवाईनंतर हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी होत असून अशा कारवायांमुळे आमचे मनोबल संपणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. त्यावरून संजय राऊत यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यांचे मनोबल अगोदरच संपलेल आहे असा खोचक टोलाही विखे पाटलांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button