breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Women’s IPL 2023 : महिला प्रीमियर लीगसाठी ४०९ खेळाडूंचा समावेश

२४६ भारतीय आणि १६३ परदेशी खेळाडूंचा समावेश

Women’s IPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्राच्या लिलावाबाबत बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. आयपीएलच्या धर्तीवर यंदा ४ मार्च ते २६ मार्च दरम्यान मुंबईत महिला प्रीमीयर लीग होणार आहे. या लिलावासाठीच्या खेळाडूंची यादी जाहिर करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी एकूण १५०० खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातून एकूण ४०९ खेळाडूंची लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. १३ फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावात २४६ भारतीय आणि १६३ परदेशी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये २०२ कॅप्ड आणि १६३ अनकॅप्ड खेळाडू आहेत. एकूण ९० खेळाडू खरेदी केले जातील, ज्यामध्ये ६० भारतीय आणि ३० विदेशी खेळाडूंचा समावेश असेल. सर्व संघांच्या पथकात १७ खेळाडूंचा समावेश असेल, असं बीसीसीआयने सीईओ हेमांगी अमीन यांनी सांगितले आहे.

बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगच्या पाच फ्रँचायझींना पाठवलेल्या मेलमध्ये, स्पर्धेसाठी मुंबईतील दोन स्टेडियम वापरण्यात येणार असल्याची पुष्टी करण्यात आली. यामध्ये ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियम उपस्थित राहणार आहेत. संघांना जास्त प्रवास करावा लागू नये यासाठी मुंबईच्या दोन स्टेडियमची निवड करण्यात आली आहे.

५० लाख रूपये मूळ किंमत असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत २४ खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये हरमनप्रीत, शफाली, स्मृती, दीप्ती शर्मा, जेमिमा, डिव्हाईन, एक्लेस्टोन, ऍशले गार्डनर, पेरी, स्क्राइव्हर, रेणुका, लॅनिंग, पूजा, डॉटिन, डॅनी व्याट, रिचा, एलिसा, जेस जोनासेन, स्नेह राणा, ब्रुट, मेघना सिंग, डर्सी, ब्राउन आणि लॉरिन फिरी यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button