breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेची जनजागृती मोहीम

पिंपरी / महाईन्यूज

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जनजागृती सुरू केली आहे. 24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त निगडी येथील यमुनानगर, ओटास्कीम या ठिकाणी सोशल डिस्टंस नियमांचे पालन करत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला 102 नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ. संध्या भोईर (एमओटीयू), डॉ. धीरज तायडे (एमओ) यांनी क्षयरोगाविषयी लक्षणे, निदान आणि उपचार याविषयी नागरिकांना माहिती दिली. चंद्रशेखर सरवदे (एसटीएस) यांनी आहार व व्यायाम या विषयी मार्गदर्शन केले. मनीषा काळे (एसटीएलएस), संजय भवारी (एमपीडब्लू) आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक निहाल सय्यद (टीबीएचव्ही) यांनी केले. अर्चना नटवे (टीबीएचव्ही) यांनी आभार मानले. हा कार्यक्रम अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button