breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आजपासून घरगुती गॅस सिलिंडर २०० रूपयांनी स्वस्त

मुंबई : महागाईने त्रासलेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी घट केली असून या सोबतच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर २०० रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. हे अनुदान फक्त उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारचा नेमका निर्णय काय?

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १०० रुपयांनी कमी केली होती. पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता.

हेही वाचा – ‘OTT प्लॅटफॉर्म म्हणजे निव्वळ टाईमपास आहे’; हेमा मालिनी यांचं विधान चर्चेत

मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरच्या दराचा आज आढावा घेण्यात आला. त्यानंतर आजच मोदी सरकारने दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देत सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त केला करण्यात आला आहे.

पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेत असतात. त्यामुळे १ तारखेपासून नवे दर लागू होणार असल्याचे सांगतात आले आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले असून देशात विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. ही आघाडी एकजुटीने मोदी सरकारला निवडणुकीत तोंड देणार आहे. विरोधक महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला जाब विचारणार आहेत. त्यातच केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती दोनशे रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button