breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठवाडा आणि त्याच्या आसपासच्या भागात 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत 11 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले . मात्र आता राज्यात आणि मुंबईत हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे जोरदार पावसाची सर्वजन वाट पाहत आहेत… राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. तर मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाडा आणि त्याच्या आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईत हलक्या मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा आणि त्याच्या आसपासच्या भागात 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आयएमडी जीएफएस मॉडेलनुसार वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईत काल वर्सोवा, अंधेरी भागात जोरदार पाऊस झाला. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहणार असून अधूनमधून सरी बरसतील असा अंदाज आहे.

दरम्यान भारतात यावर्षी समाधानकारक पाऊस होईल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनासह सामान्यांसाठी देखील ही माहिती अतिशय दिलासादायक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button