breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

स्थानिक बुद्धिबळ स्पर्धामधूनच उद्याचे प्रज्ञानंद घडतील !

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची भावना : कै. सुरेश चोंधे-पाटील स्मृतीनिमित्त बुद्धिबळ स्पर्धा

पिंपरी : बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा खेळाडू प्रज्ञानंद उत्कृष्ट कामगिरी करत जागतिक विजेतेपद स्पर्धेत उपविजेता ठरला. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत प्रज्ञानंदने दिलेली लढत हा सर्व देशवासियांसाठी कौतुकाचा विषय ठरला. चोंधे कुटुंबीयांनी यांनी घेतलेल्या बुद्धीवर स्पर्धेतून प्रज्ञानंद सारखे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा आशावाद भारतीय जनता पक्षाचे पिंपरी%चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

सांगवी येथील बीएस नायक स्पोर्ट्स फाउंडेशन आणि विश्वविजेते चेस अकॅडमीच्या वतीने कै. सुरेश चोंधे-पाटील स्मृती चषक  एकदिवसीय जलद (रॅपिड) खुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी शंकर जगताप बोलत होते. यावेळी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप, भाजपा नेते श्री.सचिन साठे, यांच्यासह आयोजक भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, माजी नगरसेविका आरती चोंधे, रवींद्र वकील, पंच प्रमुख चिन्मय नाईक,  मा.स्वीकृत सदस्य श्री.गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.भुलेश्वर नांदगुडे, श्री.काळूराम नांदगुडे, श्री.रामदास कस्पटे, श्री.प्रसाद कस्पटे, श्री.शिवराज लांडगे, श्री.दिनेश यादव, श्री.दिगंबर गुजर, श्री.उदय गायकवाड  आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले की, शहरातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी खेळाडूंना योग्य सुविधा पुरविणे गरजेचे आहे. शहर भाजपच्या वतीने सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामुळे स्थानिक खेळाडूंना आपला खेळ उंचावण्यास मोठ्या प्रमाणात सहाय्य मिळते.

स्पर्धेत १० वर्षांखाली गटात १० रेटेड खेळाडूंसह ८७, १४ वर्षांखालील गटात १० रेटेड खेळाडूसह ८३ खेळाडू व खुल्या गटात २२ रेटेड खेळाडूसह १०७ अशा तब्बल २७७ खेळाडू सहभागी झाले होते. १० वर्षांखालील गटात इशान अर्जुन, १४ वर्षांखालील गटात अलौकिक सिन्हा तर खुल्या गटात बुमीनाथन ललितादितायनार यांनी विजेतेपद पटकावले.

स्थानिक स्पर्धांच्या माध्यमातूनच खेळाडूचा खेळ बहरत असतो.  त्यामुळे खेळाडूंनी सातत्याने खेळाचा आणि स्पर्धांचा सराव करणे गरजेचे असते. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा महानगरपालिका सातत्याने खेळाडूंना खेळामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना अंमलात आणते. या योजनांचा खेळाडूनी लाभ घेतल्यास त्यांना आपल्या खेळात पुढे जाण्यासाठी नक्कीच साहाय्य मिळणार आहे.
शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button